Rhea Chakraborty : सुशांतच्या निधनानंतर अडचणीत आलेल्या रिया चक्रवर्तीचे कमबॅक; ७ वर्षांनी पुन्हा एकदा झाली सज्ज
Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती 'फॅमिली बिझनेस' या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनय कारकिर्दीची नवी सुरुवात करणार

Rhea Chakraborty : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करण्यात आले. तिच्यावरच सुशांतला ड्रग देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप झाले होते. इतकेच काय तर तिला तुरुंगात देखील जावं लागलं.
काही महिन्यांपूर्वीच रियाला क्लीनचीट मिळाली. या संपूर्ण घटनेनंतर ती सिनेसृष्टीपासून दूर होती. अखेर ती या घटनेतून सावरत पुन्हा एकदा कमबॅक करण्यास सज्ज झाली.
रिया चक्रवर्ती ‘फॅमिली बिझनेस’ या वेब सीरिजच्या माध्यमातून आपल्या अभिनय कारकिर्दीची नवी सुरुवात करत आहे. या पुनरागमनाबाबत रियाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने पोस्टच्या कॅप्शनमध्ये आयुष्यातील चढ-उतारांबद्दल भाष्य केले.
Pune News : अजित पवारांच्या निधनानंतर पुणे महानगरपालिकेचा अजब निर्णय; टिकेनंतर निर्णय मागे
‘अनेकदा आयुष्य असा वळण घेते, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते, आणि तेच वळण आपल्याला पुढे जाण्याची शिकवण देते.’ दरम्यान, तिच्या या व्हिडिओनंतर चाहत्यांनीही तिला नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
नुकतेच या सिरीजच्या इव्हेंटमध्ये रियानेही इतर स्टारकास्टसोबत हजेरी लावली होती. गुलाबी रंगाच्या साडीत ती सुंदर दिसत होती. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. Rhea Chakraborty
‘फॅमिली बिझनेस’ ही एक कॉर्पोरेट ड्रामा सिरिज आहे, जिथे कुटुंब आणि बिझनेसची कहाणी पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये रिया चक्रवर्तीचीही भूमिका आहे. यामध्ये अनिल कपूर आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय नेहा धुपिया,आकाश खुराना, नंदिश संधू, रायमा सेन, ध्रुव सेहगल यांचीही भूमिका आहे.
हेही वाचा:
Mrunal Thakur: मृणाल ठाकूर म्हणते, “चांगला माणूस मिळाला तर लगेच लग्न करेन”





