पुणे | सनदी लेखपाल परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल अर्थात सीए
अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
त्यानुसार इंटरमिटिएट अभ्यासक्रम गट एकची परीक्षा ३, ५ आणि ९ मे रोजी, गट दोनची परीक्षा ११, १५ आणि १७ मे रोजी होणार आहे, तर अंतिम अभ्यासक्रमातील गट एकची परीक्षा २, ४ आणि ८ मे रोजी, तर गट दोनची परीक्षा १०, १४ आणि १६ मे रोजी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजित परीक्षेच्या वेळापत्रकात बदल शक्य असल्याचे आयसीएआयकडून जाहीर करण्यात आले होते, तसेच सुधारित वेळापत्रक १९ मार्चला जाहीर करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार नियोजित वेळापत्रकात बदल करून आयसीएआयने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. अधिक माहिती आयसीएआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





