प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित यांची जोडी तब्बल एका दशकानंतर रुपेरी पडद्यावर रसिकांना एकत्रित दिसणार आहे.
“वर्तमान’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून पत्रकारिता, राजकारण, समाजकारण यावरती थेट भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार, खासदार आणि नेतेमंडळी यांचा जनतेशी व सर्वसामान्य नागरिकांशी वागण्याचा व पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. अशा ज्वलंत विषयावर या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात सुबोध भावे, मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर, कुलदीप पवार, अवतार गिल, तेजस्विनी पंडित, संजय मोहिते अशा अनेक कलाकारांनी अभिनय केला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर यांनी केले असून संगीत हर्षित अभिराज यांचे आहे. “वर्तमान’ मे महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील यांनी दिली.