काबुलवरून पुन्हा परतीची विमाने सुरू
Updated On:

काबुल – काबुल विमानतळावर काल झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तेथून निर्वासितांना घेऊन जाणारी विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली होती. पण आज मात्र ही परतीची विमान उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. आज शुक्रवारी सकाळी काबुल विमानतळावरून अनेक विमानांनी उड्डाण केले.
अमेरिकन व नाटो फौजांच्या माघारीचा अंतिम दिवस हा 31 ऑगस्ट हा ठरला आहे. ती डेडलाईन पाळण्यासाठी सध्या मोठी धावाधाव सुरू आहे. त्या अवधीत हे काम पुर्ण होईल की नाही याची अजून शाश्वती नाही. तथापि ही मुदत वाढवली जाण्याची शक्यताही अद्याप सूचित करण्यात आलेली नाही. काबुलच्या विमानतळाबाहेर तालिबानी गनिमांचा बंदोबस्त असला तरी अजून हे विमानतळ मात्र अमेरिकन फौजांच्याच ताब्यात आहे.





