कांद्यामुळे पुन्हा वांदा!

किरकोळ बाजारात भाव 60 रुपयांच्या घरात 

पुणे – कांद्याच्या भावात घाऊक बाजारात मागील तीन दिवसांत किलोमागे 2 ते 3 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचे डोळे पाणावले आहेत. तर, दुसरीकडे भाववाढ झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मार्केट यार्डात प्रतिदहा किलो कांद्यास 280 ते 320 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ आणि रितेश पोमण यांनी दिली. किरकोळ बाजारात 40 ते 60 रुपये भावाने विक्री होत आहे.

अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा भिजलेला आहे. तसेच लागवड देखील धोक्‍यात आली असून जुन्या कांदा कमी प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे भाववाढ होत आहे.

जुना कांदा वखारीत ठेवून जवळपास सहा महिने झाले असल्यामुळे सद्यस्थितीत खराब कांद्याचे प्रमाण वाढलेले आहे. उच्च प्रतिच्या कांद्याची आवक कमी होत असून उच्च प्रतिच्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. श्रीगोंदा, नगर, आष्टी परिसरात मोठा पाऊस न झाल्यामुळे पावसाअभावी नवीन कांद्याचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. नवीन कांद्याची आवक सुरू होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे भुजबळ, पोमण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.