पुणे | प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सातही शाळांचा निकाल शंभर टक्के

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माॅडर्न हायस्कूलच्या दहा शाळांपैकी ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बारावीप्रमाणे दहावी निकालातही संस्थेतील शाळांनी घवघवीत यश मिळविले आहे.
शिवाजीनगर येथील इंग्रजी माध्यमाचे माॅडर्न हायस्कूल, गणेशखिंड रस्त्यावरील माॅडर्न हायस्कूल, पाषाण येथील इंग्रजी माध्यमाचे माॅडर्न हायस्कूल, निगडी येथील माॅडर्न हायस्कूल, वारजे येथील माॅडर्न हायस्कूल आणि इंग्रजी माध्यमाचे माॅडर्न हायस्कूल आणि भोसे (ता. खेड) येथील माॅडर्न हायस्कूल अशा एकूण ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे, तसेच, निगडी येथील माॅडर्न हायस्कूलचा निकाल ९८.९१ टक्के,
शिवाजीनगर येथील माॅडर्न हायस्कूलचा ९८.६० टक्के आणि पीईएस गर्ल्स हायस्कूलचा निकाल ९६.५७ टक्के निकाल लागला आहे. अनुक्रमे सुमेश माने, अनुष्का वावरे, तनिष्का पवार, सार्थक आव्हाड, प्रेम चव्हाण, मानव बिरादार, कल्याणी खोल्लम, श्रावणी धामणे, ओम जेट्टे आणि श्रद्धा पाटील यांनी शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
दहा शाळांनी निकालात यश मिळविले असून, या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे आणि कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.





