प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आलेली नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता होती. परंतु निवडणूक लढण्याआधीच भाजप-राष्ट्रवादीची युती जिंकली आहे. विरोधकांनी कच खाल्ली आणि निवडणुकीपूर्वीच भाजप-राष्ट्रवादीच्या युतीने निवडणुकीपूर्वी बहुमताचा आकडा ओलांडला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीमधून दिनांक 21 अखेर 41 जणांनी माघार घेतली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचे 19 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.तर शिल्लक सहा प्रभागांमध्ये नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी पाच पैकी दोघांनी माघार घेतल्याने तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहे.नगर परिषदेची निवडणूक जाहीर होताच नगरसेवक पदाकरिता एकूण 140 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधून 41 सदस्यांनी माघार घेतली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक दोन अ, प्रभाग क्रमांक तीन अ, प्रभाग क्रमांक तीन ब,प्रभाग क्रमांक पाच ब, प्रभाग क्रमांक सात ब ,प्रभाग क्रमांक आठ अ ,प्रभाग क्रमांक आठ ब तसेच प्रभाग क्रमांक दहा अ व प्रभाग क्रमांक दहा ब या प्रभागांमध्ये निवडणुकीच्या लढती होणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच अर्ज पैकी विशाल वाळुंज व सौरभ दाभाडे यांनी माघार घेतल्याने आता संतोष दाभाडे पाटील, किशोर भेगडे व अॅड रंजना भोसले या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालयाच्या समोर मोठी गर्दी झाली होती. बिनविरोध झाली आहे असं कळल्यानंतर उपस्थित कार्यकर्ते आनंद व्यक्त करून फटाके वाजवणे व पेढे वाटत होते. अखेरच्या दिवशी माघार घेतलेले उमेदवार प्रभाग क्रमांक एक अ निखिल उल्हास भगत, प्रभाग क्रमांक एक ब अशा अशोक भेगडे, प्रभाग क्रमांक दोन ब संदीप बाळासाहेब शेळके ,प्रभाग क्रमांक चार अ सिया लक्ष्मण चिमटे, प्रभाग क्रमांक चार ब गणेश मोहनराव काकडे,प्रभाग क्रमांक पाच ब संतोष छबुराव भेगडे , प्रभाग क्रमांक सहा अ शैलजा कैलास काळोखे,प्रभाग क्रमांक सहा ब अश्विनी संतोष शेळके,प्रभाग क्रमांक सात अ स्नेहा आशिष खांडगे, प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये सत्यम गणेश खांडगे ,प्रभाग क्रमांक ९ ब हेमलता चंद्रभान खळदे , प्रभाग क्रमांक 11 कमल नामदेव टकले, प्रभाग क्रमांक ११ ब इद्रकुमार राजमल ओसवाल,प्रभाग क्रमांक 12अ मध्ये सोनाली गौरव दरेकर , प्रभाग क्रमांक 12 ब विनोद अशोक भेगडे,प्रभाग क्रमांक 13 अ शोभा सुनील परदेशी,प्रभाग क्रमांक तेरा ब दीपक निवृत्ती भेगडे ,प्रभाग क्रमांक 14अ सागर निर्गुण बोडके प्रभाग क्रमांक 14 ब सुरेखा निलेश भेगडे.