Pimpri : एक लाख हस्त लिखित गाथा निर्मिती करण्याचा संकल्प

हिंजवडी : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पंचमवेद गाथेचा एक लाख गाथा हस्तलिखाण उपक्रम वारकरी संप्रदायाने हाती घेतला आहे. संत तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरील मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमात एक लाख हस्त लिखित गाथांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर साधकांच्या या लिखाण चळवळीस हातभार लावत वाकड येथील शेतकरी हभप. निवृती तुकाराम विनोदे यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे परिवाराच्या वतीने वह्यांसाठी पावणेदोन लाखांची देणगी प्रख्यात किर्तनकाराकडे सुपूर्त करण्यात आली. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे, माजी संचालिका कुंदा विनोदे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या भारती विनोदे, हभप. पांडूरंग साखरे, ज्ञानोबा वाकडकर, राजेद्र विनोदे, अरूण वाकडकर, शांताराम विनोदे, आरती विनोदे, नेहा विनोदे आदी मान्यवरांच्या हस्ते कीर्तनकार हभप. संतोष महाराज पायगुडे व नवोदित किर्तनकार शेखर महाराज जांभुळकर यांच्याकडे या देणगीचा धनादेश सुपूर्त कारण्यात आला.
यानिमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हास लाभले. हस्तलिखित गाथा निर्मिती होणे ही एक मोठी पर्वणी आहे. त्यामुळे अशा सांप्रदायिक उपक्रमास मदत केल्याने पूर्वजांच्या ऋणातून उतराई होण्याचं भाग्य मिळेल या हेतूने या उपक्रमाला मदतीचा हात दिला आहे.
– बाळासाहेब विनोदे ( संचालक – संत तुकाराम साखर कारखाना)
याप्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप दगडे, अंकुश उभे, भाऊसाहेब पानमंद, मोहन भुमकर, धनाजी विनोदे, पंडीत आल्हाट, महादेव पापळ, संतोष पापळ, अभिजित येळवंडे, मयुर मोडक, श्रीरंग साखरे, लक्ष्मण साखरे, नरहरी वाकडकर,मारूती विनोदे, पंडीत विनोदे, मोहन विनोदे, नानासाहेब विनोदे, उतम विनोदे, नितिन विनोदे, संतोष विनोदे, दिपक विनोदे, विवेक साखरे उपस्थित होते.
यानिमित्ताने झालेल्या संगीत भजन कार्यक्रमात गायनाचार्य मुरलीधर पंडित, दिपाली ढमाळ या गायकांना सिध्दीविनायक पैठणकर (तबला), कृष्णा भालसत्रे (पखवाज) विठ्ठल ढमाळ (टाळ) यांनी अप्रतिम साथ संगत केली. राजेद्र करपे यांनी सुत्रसंचालन केले. अन्नप्रसादाने उपक्रमाची सांगता झाली.





