पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मेद श्तायेह यांचा राजीनामा
Updated On:

जेरुसलेम – पॅलेस्टाईन प्राधिकरणामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुधारणा करणे शक्य व्हावे, यासाठी पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मेद श्तायेह यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे.
पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी अद्याप श्तायेह यांचा आणि त्यांच्या सरकारचा राजीनामा स्वीकारण्याबाबतचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. मात्र यामुळे पॅलेस्टाईन प्रशासनामध्ये सुधारणा करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
गाझामधील युद्ध समाप्त झाल्यानंतर तेथील प्रशासकीय रचना सुधारलेली असण्यासाठी पॅलेस्टाईन प्राधिकरणामध्ये सुधारणा करण्याचा आग्रह अमेरिकेकडून आतापासूनच धरला जातो आहे. मात्र या सुधारणा प्रत्यक्ष्यात अस्तित्वात येण्यासाठी अनेक अडथळे येत आहेत.





