पुणे | गृहमंत्री राजीनामा द्या… ; पोलिसावर हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हडपसर परिसरात गुन्हेगारांनी पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले पोलिस अधिकारीच सुरक्षित नसतील, तर याचा अर्थ राज्याची कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे.
असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या मागणीसाठी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या आंदोलन करण्यात आले. आंदोलनास शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर,
स्वाती पोकळे, किशोर कांबळे, शेखर धावडे, नितीन रोकडे, मीना पवार, विमल झुंबरे, वंदना मोडक, प्रवीण आल्हाट, शैलेंद्र बेल्हेकर, राजेश आरणे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





