पुणे जिल्हा | हुसेनिवाला बॉर्डर येथे हुताम्यांना राजगुरूनगरवासीयांकडून अभिवादन

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – हुतात्मा राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या 94 व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील मान्यवरांकडून हुसेनिवाला बॉर्डर फिरोजपूर पंजाब येथे शहीदांना अभिवादन करण्यात आले.
क्रांतिकारकांचे अभ्यासक आणि क्रांतिवीर राजगुरूनगर ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे यांच्यासह दादाभाऊ चौधरी ,अरुण सांडभोर , दत्तात्रेय शिंदे , पांडूरंग सांडभोर, वैशाली चौधरी , सविता शिंदे , जयश्री सांडभोर, संगिता पाचारणें, सविता सांडभोर यांच्यासह सहभागी महिला पुरुषांनी हुसेनिवाला बॉर्डर फिरोजपूर पंजाब येथे शहीद राजगुरु, भगतसिंग व सुखदेव यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
यावेळी भगतसिंग यांचे पुतणे किरणजितसिंग संधू, राणासिंग संधू, सुमन कटारिया, पुरण जसुजा आदी उपस्थित होते. भाजपचे माजी प्रदेशाउपाध्यक्ष सत्येंद्रसिंग जानी, मंत्री लालजितसिंग भुल्लर, फिरोजपुरचे चारही आमदार, जिल्हाधिकारी समवेत यांनीही अभिवादन केले. पंजाब येथे झालेल्या अभिवादन कर्करामत विठ्ठल पचारणे यांनी शहीद राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना भारतरत्न द्यावे अशी मागणी केली.





