Pimpari News : मशिनमध्ये अडकलेल्या तरुणाची सुटका; पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाची कामगिरी

पिंपरी : आरएमसी कॉंक्रिट पंप मशिनमध्ये अडकलेल्या तरुणाची पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानाने सुखरूप सुटका केली. ही घटना मंगळवारी रात्री पिंपळे सौदागर येथील शिवार गार्डन चौकाजवळ घडली. भागवत घुगे (वय २५) असे सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे.
लिंडींग फायरमन सारंग मंगरूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एकजण मशिनमध्ये अडकला असल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार रहाटणी आणि अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. आरएमसी कॉंक्रिट पंप मशिनमध्ये एका तरुणाचा पाय अडकल्याचे दिसून आले. रॉड कटींग ग्रॅडर, बोल्ट कटर सेपरेटर या मशिनच्या मदतीने अडकलेल्या तरुणाची अवघ्या १५ मिनिटांमध्ये सुटका करण्यात आली.
‘या’ पथकाने केली कामगिरी
लिंडींग फायरमन सारंग मंगरूळकर, यंत्रचालक रुपेश जाधव, काशिनाथ ठाकरे, सरोज फुंडे, भूषण येवले, वाघेरे, पवार, मोरे, गावडे, पाटील, दरवेश, बल्लाळ, तोडनकर, उचाळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.





