Nagar : कत्तलीसाठी जाणार्या 27 जनावरांची सुटका
Updated On:

अहिल्यानगर : कत्तलीसाठी टेम्पोतून घेऊन जाणार्या 27 जनावरांची सुटका केली. जनावरे व टेम्पो असा सात लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. शनिवारी (21 डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास वाळुंज बायपास शिवारात पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने ही कारवाई केली.
या प्रकरणी चांगदेव गोरख भालसिंग (वय 32 रा. वाळकी ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात जावेद शहानवाज शेख (वय 40 रा. गोविंदवाडी, कल्याण वेस्ट, जि. ठाणे), मुस्तारबा मिरमहमंद शेख (वय 55 रा. भिवंडी, ठाणे) व राहील ऊर्फ महंमद हुशेन शेख (रा. कल्याण वेस्ट, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. टेम्पोतून एकूण 27 म्हैस वर्गीय जनावरे मिळून आले.





