पिंपरी | पीएमपीएमएल च्या कंत्राटी भरतीस रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा विरोध

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. वाहतूक संस्थेतर्फे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडी या हद्दीमध्ये प्रवाशांची वाहतूक व्यवस्था केली जाते. रोज जवळपास दहा ते पंधरा लाख लोकसंख्येला सुरक्षित प्रवास करण्याचे महत्त्वाचे काम पीएमपीएम च्या माध्यमातून केले जाते,
जवळपास दहा ते अकरा हजार कर्मचारी असलेली ही संस्था पुणे महानगरपालिका पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडी च्या संयुक्त आर्थिक ध्येय माध्यमातून चालवली जाते, आता या संस्थेमध्ये खाजगीकरणाचा घाट रचला जात आहे.
आतापर्यंत बसेस आणि चालक या ठेकेदार पद्धतीने घेतल्या जातात पण आता अतिशय महत्त्वाचा घटक असणारा वाहक या पदाकरता सुद्धा कंत्राटी पद्धतीने वाहक भरती करण्याचा घाट रचला जात आहे,
कारण वाहक हा पीएमपीएमएल चा अतिशय महत्त्वाचा घटक असून तो कंत्राटी पद्धतीने भरती केला जाऊ नये याकरिता रिपब्लिकन एम्प्लॉजईज फेडरेशनच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष नागेश गायकवाड, कार्याध्यक्ष गणेश कदम,
कोथरुड आगाराचे अध्यक्ष दिपक तेली यांनी रिपब्लिकन एम्पलॉइज फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार मंदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पालकमंत्री व पुणे शहरातील सर्व आमदार खासदारांना निवेदन देण्यात आलेले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदनामार्फेत कंत्राटी पद्धतीने वाहक (कंडक्टर) भरती न करण्याचा व तीव्र निषेध करुन आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.



