ओझर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रक विद्यालयात स्वतंत्र भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गावातून विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामसचिवालयाचे ध्वजारोहण सरपंच प्रदीप थोरवे यांनी तर प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर देवणे यांनी केले. तर न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे ध्वजारोहण विघ्नहर सहकारी साखर कारखाचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांच्या करण्यात आले. विद्यालयाच्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक संचलन करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली.
गावातील माजी सैनिक सोपान किसन शेरकर, राजाराम बाबुराव थोरवे, गुलाब शंकर शेरकर यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्य सैनिक स्मृती कोनशीला पूजन’ करण्यात आले. अतिशय भारावलेल्या स्वरात स्वातंत्र्य सैनिकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या. घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. ‘संविधान प्रतिज्ञा’ व ‘स्काऊट गाईड प्रतिज्ञा’ वाचन विद्यार्थ्यानी केले. प्रस्तावना प्रसाद हांडे तर स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख रामचंद्र अय्यर यांनी केले . ग्रामस्थांच्या कायम ठेवीतून येणाऱ्या व्याजातून या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . या प्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका अनघा घोडके, सरपंच प्रदिप थोरवे, उपसरपंच वैशाली थोरवे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधीर देवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल विधाटे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष सचिन विधाटे, पोलिस पाटिल अमोल थोरवे ,सचिन थोरवे,नंदूशेठ शेरकर, डॉ .बी.व्ही. राऊत , हरिश्चंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तर जनार्दन खेडकर यांनी आभार मानले.