Girish Mahajan post : देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जात त्यांच्या हस्ते ध्वजारोहन केले. मात्र, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्तादिनी ध्वजवंदन करताना राज्यघटनेचे शिल्पकार डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळल्याने मोठा वादा निर्माण झाला आहे. यानंतर गिरीश महाजन यांनी एक्सवरून एक पोस्ट शेअर केली आहे. मोठ्या वादानंतर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते… म्हणून आपण आहोत ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग 40 वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. असे गिरीश महाजन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे,” असे म्हणत त्यांनी निर्माण झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न पोस्टद्वारे केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप देखील जोडली आहे. हेही वाचा : नॅट सायव्हर-ब्रंटचा ऐतिहासिक ‘धडाका’! WPL इतिहासातील पहिल्या शतकासह मुंबईचा आरसीबीवर दिमाखदार विजय नेमकं काय घडलं? नाशिकमधील शासकीय ध्वजवंदन गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाजन यांनी आपले भाषण केले. या भाषणात त्यांनी घटनेचे शिल्पकार महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचा आरोप वनविभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी केला. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटले. महिला अधिकाऱ्याने घेतली आक्रमक भूमिका आपल्याला सस्पेंड केले तर चालेल पण बाबासाहेबांचा उल्लेख टाळणे सहन करणार नाही, अशी आक्रमक भूमिका माधवी जाधव यांनी घेतली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने माधवी यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, माधवी जाधव आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते… म्हणून आपण आहोत ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात… pic.twitter.com/qNuZ3BcbOy — Girish Mahajan (@girishdmahajan) January 26, 2026 माधवी जाधव नेमक्या काय म्हणाल्या? “ज्या व्यक्तीने देशाला संविधान दिले, लोकशाही दिली, त्याचं नावही घेतलं नाही. तुम्ही माफी मागावी. मला सस्पेंड करा, माझी नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिटू देणार नाही. बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही.” असे माधवी जाधव म्हणाल्या. या नंतर मंत्री गिरीश महाजन यांनी अनावधानाने नाव राहिले असेल अशी प्रतिक्रिया देत दिलीगिरी व्यक्त केली. चर्चेचा विषय राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. विरोधकांनी गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. नाशिक जिल्ह्यासह राज्यात माधवी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. खरंतर शासकीय कार्यक्रमात थेटपणे बोलण्यास कर्मचारी धजावतात. पण या महिला अधिकाऱ्याने दाखवलेले धाडस चर्चेचा विषय ठरत आहे. हेही वाचा : Bhagat Singh Koshyari : पुरस्कार की जखमेवर मीठ? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच राजकारण तापलं; ‘या’ जुन्या वक्तव्यांचा भडका