आरबीआयकडून दिलासा ; सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात ; ६ टक्क्यांवर आणला रेपो दर

Repo Rate । रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात करत ईएमआय धारकांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो दरात ०.२५% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ते ९ एप्रिल दरम्यान झालेल्या एमपीसी बैठकीनंतर आज सकाळी आरबीआयने हा निर्णय घेतला. रेपो दरात कपात झाल्याने लोकांच्या गृह आणि कार कर्जाचा ईएमआय कमी होणार आहे.
सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात Repo Rate ।
आरबीआयने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. मात्र, तज्ज्ञांना आरबीआयच्या या हालचालीची आधीच अपेक्षा होती. गेल्या फेब्रुवारीमध्ये, आरबीआयने रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर रेपो दर ६.५०% वरून ६.२५% पर्यंत खाली आला. जून २०२३ मध्ये, आरबीआयने रेपो दर ६.५०% पर्यंत वाढवला. म्हणजे हा बदल ५ वर्षात झाला. मात्र, बँकेतील ठेवींच्या दरांमध्ये कोणताही बदल होण्याची आशा फारच कमी आहे. म्हणजेच, गृहकर्ज घेणाऱ्यांना बँकेकडून फायदा मिळू शकतो, परंतु ठेवीदारांना तो लाभ मिळणार नाही.
#WATCH | Mumbai | RBI Governor Sanjay Malhotra says, ” The MPC (Monetary Policy Committee) voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points to 6 % per cent with immediate effect.”
(Source: RBI) pic.twitter.com/rRVCJiTy0H
— ANI (@ANI) April 9, 2025
रेपो रेट घटल्यामुळे कोणाला फायदा होणार? Repo Rate ।
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार १ ऑक्टोबर २०१९ नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचे आहे. त्यामुळे आरबीआने रेपो रेट घटवल्यास बँकांना देखील गृह कर्जावरील व्याज घटवावं लागू शकतं. जर आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज देखील स्वस्त होऊ शकतं. याचा फायदा नवं गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना फायदा होईल. जानेवारी ते एप्रिल दरम्यान अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या गृहकर्जात ५-२५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे.





