Worli BMW Accident| मागील काही दिवसांपासून ‘हिट अँड रन’च्या अनेक घटना समोर येत आहे. यातच आता वरळीत हिट अँड रन’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. एका बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. 20 जुलै रोजी ठाण्यातील व्यावसायिकाच्या गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला आहे. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वीच वरळीत असाच एक अपघात घडला विनोद लाड (वय 28) असं मृत तरुणाचे नाव आहे. वरळी सीफेस येथील ए.जी. खान अब्दुल गफारखान रोडवर 20 जुलै रोजी बीएमब्यल्यू कारने विनोदच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की विनोद खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच वरळीत असाच एक अपघात घडला होता. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. तर, अपघातानंतर चालक फरार झाला होता. या प्रकरणी राज्यातून संताप व्यक्त होत असताना पुन्हा एकदा अशीच घटना वरळीत घडली. अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटरगाडी चालवत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. मोटरगाडी ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मूळचा मालवण येथील रहिवासी असलेला विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. Worli BMW Accident| पुणे आणि वरळीतील अपघात चर्चेत पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर वरळीतील अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. 9 जुलै रोजी कावेरी नाखवा नावाच्या महिलेला बीएमडब्ल्यू कारने दोन किलोमिटरपर्यंत फरफटत नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. ही कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह दारू पिऊन चालवत होता. पुणे आणि वरळीतील या दोन्ही प्रकरणांमध्ये चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे होत गेले. यानंतर राज्यात ‘हिट अँड रन’ची वारंवार घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. Worli BMW Accident| हेही वाचा: ‘कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांना कोणताही धोका पत्करायचा नाही’ ; असे का म्हणाले सरन्यायाधिश चंद्रचूड? वाचा