‘Tere Ishq Mein’ ‘teaser : ‘रांझणा’ या गाजलेल्या चित्रपटाची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटाचा हटके टीझर रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बहुचर्चेत चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. अखेर चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून या चित्रपटात अभिनेता धनुष आणि बॅालिवूड अभिनेत्री क्रिती सेनन पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपटाच्या हटके टीझरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. २ मिनिटे ४ सेकंदाच्या या टीझरची सुरुवात कृती सॅननच्या पात्राच्या लग्नाने आणि हळदी समारंभाने होते. या समांरभात धनुषचे पात्र जखमी अवस्थेत येते आणि म्हणते, “मी माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी बनारसला गेलो होतो. मी विचार केला होता की मी तुझ्यासाठी गंगाजल आणेन.” तू एक नवीन आयुष्य सुरू करणार आहेस, तुझी जुनी पापं धुवून टाकणार आहेस.’ यानंतर टीझरमध्ये क्रिती आणि धनुषच्या प्रेमकथेची झलक दिसते. View this post on Instagram A post shared by tseriesfilms (@tseriesfilms) टीझरमध्ये दोघांचा प्रेमाने भरलेला प्रवास, नंतर उत्कटता आणि शेवटी सूड, अशा स्वरुपात दाखविण्यात आला आहे. या टीझरने धनुषच्या रांझणा या चित्रपटाची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. पण त्या चित्रपटातील लव्हस्टोरी आणि या चित्रपटातील लव्हस्टोरी यात खूप फरक आहे. आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिले आहे आणि गीते इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात धनुष आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत असून धनुषने चित्रपटात “शंकर” नावाची व्यक्तिरेखा साकारलेली आहे. तर क्रिती सेननने मुक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. हेही वाचा : पुण्यातून थेट युरोपला; निलेश घायवळ परत येण्याची वाट पहावी लागणार