“लक्षात ठेवा हे देवाभाऊंचे राज्य आहे, इथे गुन्हेगाराला माफी नाहीच!”; वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Chitra Wagh : पुण्यातील मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला, याचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सुनेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांनी पती पती, सासू आणि नणंद यांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि मुलाचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजप नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार चित्रा यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी लग्न आणि अवघ्या २३व्या वर्षी एका नवविवाहित मुलीने आपलं आयुष्य संपवलं – कारण हुंड्याची छळवणूक…!
दुर्दैवाने ही घटना राष्ट्रवादी नेता राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली आहे
वैष्णवी ही हगवणेंची सून होती.या केसमध्ये मी स्वतः पोलिसांशी बोलले असून नवरा सासू नणंद…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 19, 2025
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
दोन वर्षांपूर्वी लग्न आणि अवघ्या २३व्या वर्षी एका नवविवाहित मुलीने आपलं आयुष्य संपवलं – कारण हुंड्याची छळवणूक…! दुर्दैवाने ही घटना राष्ट्रवादी नेता राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली आहे. वैष्णवी ही हगवणेंची सून होती. या केसमध्ये मी स्वतः पोलिसांशी बोलले असून नवरा, सासू, नणंद अटकेत आहेत. तर दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे फरार आहेत. ते ही लवकरच पकडले जातील.





