हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे गोऱ्हे बुद्रुक येथे स्थलांतर 

Updated On:
हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे गोऱ्हे बुद्रुक येथे स्थलांतर 

खडकवासला(प्रतिनिधी) –  हवेली उपविभागीय  पोलिस अधिकारी कार्यालयाचे जागेअभावी रेंगाळले स्थलांतर  सिंहगडाच्या पायथ्याशी गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत नुकतेच झाले असून काल पासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर आणि लोणीकंद पोलिस ठाणे यांचा समावेश शहरात झाल्यानंतर उपविभागीय पोलीस कार्यालय लोणी काळभोर येथून  हलवण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला होता. त्यानंतर दोन महिने कामकाज पिरंगुट येथील कार्यालयातून करण्यात आले, परंतु आवश्यक जागा मिळाल्यानंतर गोऱ्हे  येथून  कामकाजास सुरुवात झाली आहे.

प्रत्यक्ष कामकाज सुरू केल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले  यांच्याशी प्रभातने प्रत्यक्ष संवाद साधला.  ते म्हणाले, अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होईल असे काम आमच्याकडून करण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांनीही निर्भीडपणे संपर्क साधून माहिती द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

उपविभागीय अधिकारी ढोले यांनी त्यांचा व्हाट्सअप नंबर संपर्कासाठी सर्वांसाठी उपलब्ध करून दिला असून  8796801181 या क्रमांकावर व्हाट्सअप करून संदेश पाठवून माहिती द्यावी असेही आवाहन त्यांनी केले आहे. गुन्हेगारी व अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी संबंधित बातम्या

'पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या सोलापूर दालनाचे स्थलांतर आता भव्य स्वरूपात

2024-09-13 15:40:19

'पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या सोलापूर दालनाचे स्थलांतर आता भव्य स्वरूपात

पुणे जिल्हा : इंदापुरात उद्या पीडिसी बँकेचे स्थालांतर, शाखेचे नुतनीकरण

2024-06-15 08:09:07

पुणे जिल्हा : इंदापुरात उद्या पीडिसी बँकेचे स्थालांतर, शाखेचे नुतनीकरण

सिंहगड (पुणे): गोऱ्हे बुद्रुक येथील अवैध दारू धंद्यावर कारवाई

2022-04-24 21:02:36

सिंहगड (पुणे):  गोऱ्हे बुद्रुक येथील अवैध दारू धंद्यावर कारवाई

Pune | कोथरूड, पौड रस्ता येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरणास विरोध

2021-06-09 16:55:04

Pune | कोथरूड, पौड रस्ता येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरणास विरोध

पुरंदर विमानतळाच्या जागा बदलाच्या हालचाली

2021-01-20 08:00:37

पुरंदर विमानतळाच्या जागा बदलाच्या हालचाली