LPG Cylinder Price | नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एलपीजी सिलिंडर आजपासून 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील आठ महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीचे दर स्थिर आहेत. मार्च 2024 मध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी झाली होती. दिल्लीमध्ये 803, कोलकात्यात 829, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळत आहे. LPG Cylinder Price | व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर IOCL च्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर 1804 रुपयांना मिळणार आहे. याआधी 1818.50 रुपयांना मिळत होता. 1 जानेवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत मुंबईमध्ये 1756 रूपये, कोलकातामध्ये 1911 रुपये झाली आहे. कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 16 रुपयांनी कमी झाली. दरम्यान, मागील काही महिन्यापासून सलग व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यानुसार ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. LPG Cylinder Price | हेही वाचा: बीड प्रकरण: ‘धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?’ फडणवीस म्हणाले…