रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना दिलासा
Updated On:

सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
परभणी – शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 346 दिवस कारागृहात राहिल्यानंतर त्यांना या प्रकरणात जामीन मंजुर करण्यात आला आहे. गुट्टे यांनी कारागृहातूनच 2019मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले हे विशेष.
औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने 26 मार्च 2019 रोजी रत्नाकर गुट्टे यांना अटक करुन गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते. यानंतर हे प्रकरण बरीच दिवस औरंगाबाद उच्च न्यायालयात चालले. तिथे त्यांना जामीन मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयातून त्यांनी सर्वोच न्यायालयात दाद मागितली आणि तिथेही अनेक तारखा झाल्यानंतर त्यांना तब्बल 346 दिवसानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.





