Rahul Gandhi : सावरकरांच्या ‘त्या’ विधानाबद्दल राहुल गांधी यांना कोर्टाकडून दिलासा! सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर राहण्यापासून मिळाली सूट

दिल्लीः काँग्रेसचे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान राजधानी दिल्लीतील कार्यक्रमा दरम्यान केले होते. त्यांनी केलेल्या सावरकरांच्या विधानामुळे मोठा वाद उफाळून आला होता. त्यानंतर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला.
या प्रकरणात राहुल गांधी यांना दिलासा मिळाला असून या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर राहण्यापासून त्यांना सूट देण्यात आली आहे. त्यांच्या वकीलांमार्फत न्यायालयात या प्रकरणी अर्ज दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी हा अर्ज अटी शर्तीवर मंजूर केला आहे.
सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर १० जानेवारीला राहुल यांनी व्हिडिओ कॅानफर्सिगंद्वारे या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हजर राहिले होते. माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे.
सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही. मरेन मात्र माफी मागणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत आयोजत काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात केले होते. तसेच सावकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेपासून बचावासाठी ब्रिटिशांकडे अर्ज केला असल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या सावरकर यांच्याबद्दल केलेल्या या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
या दाव्यात राहुल गांधींना २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी या दाव्यात गांधी यांना सुनावणी दरम्यान न्यायालयात स्वतः हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी, असा अर्ज न्यायालयाला केला होता. काही अटी शर्तींवर न्यायालयाने राहुल गांधी यांना या प्रकरणाची सुनावणी दरम्यान हजर राहण्यास सूट दिली आहे.





