Icc Champions Trophy : टीम इंडियाला दिलासा ! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूचे कमबॅक

टीम इंडियाने बांगलादेश आणि पाकिस्तानवर मात करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला आहे. यादरम्यान टीम इंडियाचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध पार पडणार आहे. या सामन्याच्या अगोदर टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियात एका दिग्गज खेळाडूचे कमबॅक झालं आहे.
‘या’ खेळाडूचे टीम इंडियात कमबॅक
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज आणि टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल भारतीय संघात परतला आहे. मोर्ने मोर्कल हा काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला होता. मात्र आता मोर्ने मोर्कल टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. मोर्कल परतल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना बॉलिंगचे धडे मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाची बॉलिंग अधिक मजबूत होणार यात काही शंका नाही.
अव्वल स्थान मिळवण्यासाठी चढाओढ
ए ग्रुपमधून न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघ अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघांचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 2 मार्चला होणार आहे. आता हा सामना जिंकून दोन्ही संघाना हॅट्रिक करण्याची संधी आहे. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेते? की किवी ते स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरतात? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनव्हे, जेकब डफी, मॅट हेन्री, कायल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.





