पुणेकरांना दिलासा ! चारही धरणातील पाणीसाठ्यात वाढ

Pune News | पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात रविवारी सायंकाळनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले असून, रविवारी सायंकाळी या धरणांमध्ये एकूण ५.२० टीएमसी पाणी होते.
सोमवारी सकाळपर्यंत हा साठा वाढून ५.४५ टीएमसीवर पोहोचला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे आणि नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू असून, पुढील काही दिवसांत पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चारही धरणांमध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे –
खडकवासला : ४५ मिमी
पानशेत : ९३ मिमी
वरसगाव : ९३ मिमी
टेमघर : ८० मिमी
खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. सद्यःस्थितीत धरणाच्या पाणलोट परिसरातील ओढे-नाल्यातून पाणी वाहत असून, हे पाणी धरणात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज (16 जून) देखील सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने ती कायम राहिल्यास पर्यायाने धरणाच्या पाणीपातळीत आणखी वाढ होऊ शकते.
हेही वाचा:





