Gas Cylinder Booking: ग्राहकांना दिलासा! घरगुती LPG सिलेंडर बुक करण्याबाबतचा ‘तो’ नियम रद्द
Gas Cylinder Booking: ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय

Gas Cylinder Booking: केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून ग्रामीण भागात घरगुती LPG सिलेंडर बुक करण्यासाठी 45 दिवस पूर्ण करण्याचा नियम रद्द केला आहे.
आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांनाही 25 दिवसांनी घरगुती LPG सिलेंडर बुक करता येणार आहे. सरकारने सर्व ऑइल मार्केटिंग कंपन्यांना हा नवीन नियम तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी दिली आहे.
इराण युद्धादरम्यान निर्बंध लागू केले होते
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धादरम्यान LPG पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला होता. तेव्हा सरकारनं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पावलं उचलली होती. त्यापैकीच एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी काही दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता.
त्यामुळे 9 मार्च 2026 रोजी शहरी भागात रिफिल बुकिंगमधील अंतर 25 दिवस, तर ग्रामीण भागात हे अंतर 45 दिवस करण्यात आले होते. सध्या LPG पुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा झाली आहे आणि प्रलंबित बुकिंगची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांवर लागू असलेले हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. Gas Cylinder Booking
25 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर सिलेंडर बुक करता येणार
यानुसार आता ग्रामीण भागातील एखाद्या ग्राहकाने महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडर बुक केल्यानंतर आणखी एकदा सिलेंडर बुकिंग करायचा असल्यास त्याच महिन्यात पहिला सिलिंडर बुक केल्यानंतर 25 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर 26 तारखेला सिलेंडर बुक करता येऊ शकतो.
दरम्यान, देशातील एलपीजी पुरवठा सुरळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंटर-रीफिल बुकिंग गॅप कमी करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. Gas Cylinder Booking
हेही वाचा:
Teachers’ Day : डॉ. सुशांत पाटील ग्रुपचा भव्य शिक्षक दिन सोहळा उत्साहात संपन्न






