Aditi Tatkare : राज्य सरकारची महत्वकांशी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनाचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर e-KYC ची पूर्तता केली नसेल त्या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहवे लागणार आहे, असे राज्य सरकारच्या वतीने अगोदरच जाहीर करण्यात आलेले आहे. मात्र, e-KYC ची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना राज्यातील लाडक्या बहिंणीना करावा लागत आहे. अशातच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी e-KYC करण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी लाडकीला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. सर्व्हर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर राज्य सरकारच्या वतीने काम सुरू असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली. त्यानुसार आता यासाठी २९ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना e-KYC साठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना e-KYC साठी नोव्हेंबरपर्यंत मुदत राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. पण आता पूरग्रस्त भागातील लाडकीला e-KYC साठी १५ दिवसांची मुदत वाढवून देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली. तसेच ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया होत आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले. काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे? राज्यातील लाडकींनी e-KYC करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण आता महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी होणाऱ्या अडचणींची दखल घेतली आहे. सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील त्यावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर, धाराशिव, बीड, जालनासह राज्यातील अतिवृष्टी झालेल्या लाडक्या बहिणींना e-KYC करण्यासाठी १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. हेही वाचा : Box Office Collection: ‘कांतारा चॅप्टर 1’चा 12व्या दिवशी 450 कोटींचा टप्पा पार, ‘सनी संस्कारी…’सह इतर चित्रपटांची कमाई घटली