Moshi Accident : नातेवाईक शोकसंतप्त; चार दिवसाची प्रतिक्षा अखेर हाती मृतदेह
Moshi Accident : संतप्त नातेवाइकाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

पिंपरी – मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळला आणि नऊ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने तीन मजली इमारतीचे पार्किंग आणि दोन मजले जमिनीत धसले.
८ तारखेपासून आतमध्ये अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर ११ जुलै रोजी बचाव पथकांना खालीपर्यंत उतरुन अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहचता आले. दरम्यान बचाव कार्यात झालेला विलंब, मागच्या मागून अडकलेल्या नागरिकांना बाहेर पाठविण्यात येत असल्याचा प्रयत्न पाहता अनेकांच्या संयमाचा बांध फुटला. प्रशासन आणि पोलिसांना आक्रोश, आक्रंदन आणि संतापाचा सामना करावा लागला.
मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना महापौरांनी मदत जाहीर केली. परंतु नोकरी आणि मदतीचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा मृतांच्या कुटुंबीयांना घेतला. तसेच विविध कारणांमुळे मृतांचे नातेवाईक शोकसंतप्त झाले होते.
परिस्थिती अनेकदा तणावपूर्ण झाली. प्रशासनाकडून आम्हाला काहीच सांगितले जात नाही, असा आक्षेप करत संतप्त नातेवाइकाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नातेवाइकांनी आमदार, महापौर यांना देखील नातेवाइकांनी धारेवर धरल. याच ठिकाणी जर तुमची पोर असती तर असाच काम तुम्ही केल असतं का? असे प्रश्न शोकसंतप्त नातेवाइकांनी उपस्िथत केले.
pune : आयुर्वेदिक औषधसाठ्यावर एफडीएचा छापा; ५०.३६ लाखांचा माल जप्त





