Rekha Gupta Attacked। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज सकाळी साप्ताहिक जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान घडली. आरोपी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सुनावणीच्या बहाण्याने लगावली कानशिलात Rekha Gupta Attacked। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री जनसुनावणी घेत असताना. त्याच वेळी एक व्यक्ती त्यांची तक्रार घेऊन त्याठिकाणी पोहोचला. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना थप्पड मारली. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर यांनी असेही सांगितले की, सार्वजनिक सुनावणीच्या बहाण्याने एक व्यक्ती सीएम गुप्ता यांच्याकडे पोहोचली. त्याने प्रथम मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली, नंतर ओरडण्यास सुरुवात केली आणि त्यांना कानशिलात लगावली. आरोपीला सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये नेले Rekha Gupta Attacked। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपी व्यक्तीचे वय ३५ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. भाजप नेते रमेश बिधुरी म्हणाले की, रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न जनसुनावणी विस्कळीत करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. भाजप नेते तजिंदर बग्गा म्हणाले की, सार्वजनिक सुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या बातमीने मी आश्चर्यचकित झालो आहे. मी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. बजरंगबली तुम्हाला आशीर्वाद देवो.