अभिनेत्री राणी मुखर्जीने घेतली ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट

UK PM Keir Starmer Meets Rani Mukerji | ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध यश राज फिल्म्स (YRF) स्टुडिओला विशेष भेट दिली. यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि यश राज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी पंतप्रधानांचे उत्साहात स्वागत केलं.
यावेळी ब्रिटिश पंतप्रधानांनी २०२६ पासून ब्रिटनमध्ये यश राज फिल्म्सच्या तीन प्रमुख चित्रपटांचे शुटिंग सुरू होणार असल्याचे जाहीर केले. ही भागीदारी रोजगार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक एकतेसाठी नवा अध्याय ठरणार आहे. या प्रकल्पांमुळे नव्या नोकऱ्या निर्माण होतील. ज्यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. यशराज फिल्म्सने ब्रिटनमध्ये 8 वर्षांनंतर उचललेले हे पाऊल हे भारत-ब्रिटन व्यापारी कराराचा प्रभाव आता दिसू लागला आहे. UK PM Keir Starmer Meets Rani Mukerji |
View this post on Instagram
यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी या करारावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “ब्रिटन नेहमीच आमच्यासाठी खास राहिलं आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट ब्रिटनमध्ये शूट झाला होता. पंतप्रधान किअर स्टारमर यांनी आमच्या स्टुडिओला भेट देऊन या भागीदारीवर स्वाक्षरी करणे हा आमच्यासाठी सन्मान आहे.” UK PM Keir Starmer Meets Rani Mukerji |
यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी पंतप्रधान स्टार्मर यांना स्टुडिओची सैर घडवली. तसेच तिने ब्रिटनचे पंतप्रधान आणि विधानी यांच्यासोबत चित्रपटाची स्क्रीनिंग पाहिली. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. UK PM Keir Starmer Meets Rani Mukerji |
हेही वाचा:
The Peace President…! नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी ट्रम्प यांचा नवा अवतार





