Nagar | जळीतग्रस्त दुकानांचे नगरपंचायतींच्या गाळ्यात पुर्नवसन करा

नेवासा, (प्रतिनिधी) – नेवासा शहरात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत बारा दुकाने जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल खात्याने पंचनामा अहवालात केलेला आहे. रविवारी ( पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा शहरातील नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली.
या जळीत झालेल्या दुकानदारांना शासनाची जास्तीत-जास्त अर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महसूल विभागाला पंचनामे करण्यास सांगितले.
जळीत झालेल्या नुकसानीमुळे दुकानदारांचा उघड्यावर पडलेला संसार पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी नेवासा नगरपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात जळीतग्रस्त व्यापाऱ्यांना गाळे खुले करून देण्याचा आदेश तहसिलदार डॉ.संजय बिरादार यांना दिला. तातडीने सोमवारी बैठक घेऊन मार्ग काढण्याचा आदेश दिल्यामुळे नुकसानग्रस्त दुकानदारांना आधार मिळाला.
महसूलमंत्री विखे पाटील यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, डॉ.करणसिंह घुले, ऋषिकेश शेटे, सचिन देसर्डा, डॉ.बाळासाहेब कोलते, शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ,
अॅड.के.एच.वाखुरे, माजी नगरसेवक सुनिल वाघ, राजेंद्र मुथ्था, बाळासाहेब भदगले, प्रतिक शेजुळ, गफ्फुर बागवान, प्रकाश निपुंगे, बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह भाजप – सेना व महायुतीचे पदाधिकारी व नुकसानग्रस्त व्यापारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नेवासा शहरातील व्यापारी व नागरिकांनी नेवासा नगरपंचायत कार्यालयाकडे अग्निशमन बंब नसल्यामुुळेच आग तातडीने आटोक्यात आणता आले नाही. यात लाखोचे नुकसान झाल्याच्या दुर्घटनेची कैफियत मांडली असता ना.विखे पाटील यांनी आ.गडाख यांचे नाव न घेता त्यासाठीच आपला लोकप्रतिनिधी सक्षम असला पाहिजे, अशी टीका केली.
यावेळी धनंजय डहाळे, प्रकाश निपुंगे, मनोज पारखे, रोहित पवार, अदिनाथ पटारे, सतीश गायके, किशोर गारुळे, अॅड.संजीव शिंदे, स्वप्निल मापारी, नाविद दारुवाला यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, नागरिक व व्यापारी उपस्थित होते.





