Prajkata Mali । अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आगामी चित्रपटासह वैयक्तिक गोष्टीबाबत प्राजक्ता चाहत्यांसोबत माहिती शेअर करताना दिसते. नुकतेच तिने प्रेम आणि रिलेशनशीप याबाबत प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये आपलं मत मांडल. या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाखतीत प्रेम आणि रिलेशनशीपबाबतचं प्राजक्ताला प्रश्न विचारला गेला यावर ती म्हणाली,’मध्ये-मध्ये मी प्रेमात पडते. पण मग मला कळतं की नाही, नाही, नाही… ही शेवटपर्यंत माझ्यासोबत नसणार आहे. मग मी जरा मागे येते. मी त्याला सांगते की सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे आणि मी बाजूला होते.’ असेही तिने सांगितले. यावेळी तिने ब्रेकअपच्या मुद्यावरही आपलं मत मांडलं ती म्हणाली, पाच- सहा वर्षांपूर्वी मी एका व्यक्तीच्या प्रेमात होते. पण मग मला कळालं की तो माझ्याशी खोटं बोलतोय. ती गोष्ट मला पटली नाही. त्याला मी त्याचे पुरावेही दिले. पण खरं ॲक्सेप्ट करायला हिंमत लागते मात्र त्याने ते केलं नाही. म्हणून आम्ही ब्रेकअप केलं ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला घराघरात ओळख दिली. याशिवाय हंपी, लकडाऊन, तीन अडकून सीताराम या सिनेमांमध्ये प्राजक्ताने काम केलं आहे. रानबाजार ही तिची सिरीजही गाजली. महाराष्ट्राची हास्य जत्रा या रिॲलिटी शोचं ती सूत्रसंचालन करते. नुकताच, धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या “भिशी मित्र मंडळ” चित्रपटात प्राजक्ता दिसली. हे वाचाल का ? देवी लक्ष्मी चार हातांनी कशी जन्म घेऊ शकते? वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सपा नेत्याला न्यायालयाचा दणका