अहमदाबाद विमान अपघाताच्या प्रश्नावरील ‘त्या’ कृतीमुळे अभिनेत्री ट्रोल; पोस्ट करत दिले स्पष्टीकरण

Reem Shaikh | अभिनेत्री रीम शेखचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिला पापाराझींनी अहमदाबाद येथील विमान अपघाताबाबत प्रश्न विचारला. पापाराझींनी तिला, “मॅडम तुम्ही काल झालेल्या घटनेबद्दल काय म्हणाल?”, असे विचारले. यावर रीम म्हणाली की, “का? काय झाले काल?” त्यानंतर ती हसू लागली. तिला अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत काहीही माहित नव्हते.
रीम शेखच्या या उत्तराने आणि तिच्या कृतीमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून तिच्यावर खूप टीका केली जात आहे.
कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी “बस इंस्टाग्राम पे पोस्ट शेअर करना आता है, कुछ बोलना नही’, किसी को कोई मतलब नहीं है की हमारे देश मै क्या हो रहा है,” असे लिहिले आहे. व्हिडीओमध्ये रीम शेखला हसताना पाहून नेटकऱ्यांना संताप व्यक्त केला आहे. Reem Shaikh |
View this post on Instagram
रीम शेखने ट्रोलिंगला दिलं उत्तर
ट्रोलिंगनंतर रीम शेखने पोस्ट करत लिहिले की, “ज्या लोकांनी मला विमान अपघाताबाबत माहिती नसल्याबद्दल ट्रोल केले, त्यांनी कृपया थांबा. माझी बहीण देखील एअर इंडियामध्ये काम करते. जेव्हा अपघात झाला, तेव्हा मला त्याबाबत कळलं. मी माझ्या बहिणीला रडताना पाहिलं आहे. घरी बसून तिला तुटताना पाहिलं आहे. तिने तिचे सहकारी क्रू मेंबर्स गमावले आहेत. माझ्यासाठी ही फक्त बातमी नाही. तर ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे.” Reem Shaikh |
पुढे रीम यांनी लिहिलं, “दुसरं म्हणजे, पापाराझींनी मला विचारलं होतं की कालच्या बद्दल काही बोला, विमान अपघाताबाबत काही बोल असं नाही. मला थेट अपघाताबाबत विचारलं गेलंच नव्हतं. आणि इतक्या संवेदनशील विषयावर जोपर्यंत मला थेट विचारलं जाणार नाही, तोपर्यंत मी स्वतःहून बोलणार नाही. तसंही मी मीडियाशी बोलणं टाळते. जे लोक मला असंवेदनशील म्हणत आहेत, त्यांनी कृपया समजून घ्यावं, मी कॅमेऱ्यासमोर येऊन रडू शकत नाही. या अपघातामुळे किती कुटुंब दुखात आहेत, हे मी सांगूही शकत नाही. माझी बहीण त्या लोकांसोबत काम करत होती. मी माझ्या बहिणीला त्यांच्यासाठी रडताना पाहिलं आहे. मीही तिच्यासोबत रडले आहे. कृपया कोणालाही जज करू नका. ही एक शोकांतिका आहे,” असे म्हणत तिने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
हेही वाचा:
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी सुरू; RSS आणि भाजपची नागपुरात समन्वय बैठक





