राज्यात ‘या’ जिल्ह्यात ‘रेड’ अन् ‘ऑरेंज’ अलर्ट जारी ; हवामान खात्याकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा

Red alert in Maharashtra। राज्यात सध्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, आजही हवामानशास्त्र विभागाकडून राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आलाय. यामध्ये कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे या सहा जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी Red alert in Maharashtra।
दरम्यान, मुंबईसह राज्यातील ठाणे, पालघर, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रेड अलर्ट म्हणजे काय? Red alert in Maharashtra।
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.





