GST ची विक्रमी उडी: मार्चमध्ये 1.96 लाख कोटींचे संकलन, अर्थव्यवस्थेला बळ

नवी दिल्ली – मार्च महिन्यामध्ये 1.96 लाख कोटी रुपयांची जीएसटी संकलन झाले आह.े एखाद्या महिन्यात झालेले हे सर्वात मोठे दुसरे कर संकलन आहे. देशांतर्गत कर संकलन 8.8 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आयात क्षेत्रातून झालेले जीएसटी संकलन 13.56 टक्क्यांनी वाढून 46,919 कोटी रुपये इतके झाले आहे.
सेंट्रल जीएसटी कलेक्शन 18,145 कोटी रू., राज्य जीएसटी संकलन 49,891 कोटी तर संयुक्त जीएसटी कलेक्शन 95 853 कोटी रुपये इतके झाले आहे. अधिभार संकलन 12,253 कोटी इतके आहे. मार्च महिन्यामध्ये 19,615 कोटी रुपयांचा परतावा दिला असून गेल्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यात 41 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात झालेले निव्वळ जीएसटी संकलन 1.76 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यामध्ये 7.3% वाढ झाली आहे.
एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन वाढून 2.10 लाख कोटी रुपये इतके झाले होते. त्यानंतर मार्चमध्ये आता 1.96 लाख कोटी रुपये इतके कर संकलन झाले आहे. या आकडेवारी बद्दल समाधान व्यक्त करताना विश्लेषकांनी सांगितले की, दर महिन्याला जीएसटी संकलन वाढत असल्याचे दिसून येत आहे. वर्षाच्या अखेरीस विक्री वाढते. त्यामुळे जीएसटी संकलन वाढत असते. मार्च महिन्यातही जीएसटी संकलनात वाढ झाली आहे.
एप्रिल -मार्च दरम्यान जीएसटी संकलन गेल्या वर्षाच्या याच कालावधीत विल संकलनाच्या 9.4 टक्क्यांनी वाढून 22.08 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यातील कर संकलन 10% पेक्षा जास्त वाढले आहे. तर गुजरात, कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातील कर संकलन एक ते सात टक्क्यांनी वाढले आहे. ही तफावत कशामुळे होत आहे, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.





