पाकिस्तानच्या नावे असाही एक रेकॉर्ड ! 1168 बॉल्स खेळल्यानंतर यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा

मुंबई – ICC ODI विश्वचषक 2023 चा 22 वा सामना पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (PAK vs AFG) यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर (chepock ground) खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar azam) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इमान उल हक आणि शफीक यांनी पाकिस्तान संघाला चांगली सुरुवात करून दिली.
सुरुवातीच्या षटकांमध्ये दोन्ही सलामीवीरांनी खेळपट्टी चांगल्या प्रकारे समजून घेतली आणि त्यानंतर हात खोलण्यास सुरुवात केली. नवीन उल हक आणि मुजीबच्या षटकात दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. पॉवरप्लेपर्यंत पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 56 धावा केल्या होत्या. यादरम्यान चेन्नईच्या मैदानावर पाकिस्तान संघाने एक नवीन रेकॉर्ड केला. (Worldcup 2023)
पाकिस्तान टीम सध्या आपल्या गोलंदाजीसह फलंदाजांसाठी देखील ओळखली जाते. असं असलं तरी यंदाच्या विश्वचषकामधे पाक संघाला पॉवरप्ले दरम्यान एकही षटकार ठोकता आला नव्हता. अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वचषक सामन्यात, पाकिस्तान संघाने एकदिवसीय क्रिकेट 2023 मध्ये पहिल्यांदाच पॉवरप्ले दरम्यान शानदार षटकार ठोकला. यासाठी पाकिस्तानला तब्बल 1168 बॉल्सची वाट पाहावी लागली.
संघाच्या वतीने अब्दुल्ला शफीकने डावातील ३१ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला. हा षटकार नवीन उल हकच्या षटकात आला. यामुळे पाकिस्तान संघाने या वर्षी (2023) वनडेमध्ये 1168 चेंडूंचा सामना करून पहिला षटकार ठोकला.





