‘या’ देशात पुढील वर्षापासून समलैंगिक विवाहांना मान्यता

जिनिव्हा – पुढील वर्षी 1 जुलैपासून स्वीत्झर्लंडमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात आली आहे. ज्या समलैंगिक जोड्यांनी अन्य देशात विवाह केला आहे, अशांना पुढील वर्षी 1 जानेवारीपासून मान्यता देम्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे फेडरल कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आतापर्यंत अशा जोड्यांना स्वीत्झर्लंडमध्ये केवळ नागरी पार्टनर म्हणूनच मानले जात होते. मात्र आता त्यांना वैवाहिक जोडीदार म्हणून मान्यता दिली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
यावर्षी सप्टेंबरमध्ये “मॅरेड फॉर ऑल’ हा कायदा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार आता 1 जुलैपासून नागरी भागीदारी ही प्रथा संपुष्टात येणार आहे. नागरी भागीदारीत असलेल्या जोडप्यांना लग्न न करता त्यांची देखभाल करण्याची परवानगी दिली जाईल. अशा स्वरुपाच्या नागरी बागीदारीला 2007 मध्ये स्वीत्झर्लंडमध्ये मान्यता दिली गेली होती. स्वित्झर्लंड हा पश्चिम युरोपमधील काही उरलेल्या देशांपैकी एक आहे जिथे गे आणि लेस्बियन जोडप्यांना लग्न करण्याचा अधिकार यापूर्वी दिला गेलेला नव्हता.





