Israel Attack Lebanon: ‘अमेरिका आमच्यावर कितीही दबाव आणो..’, लेबनॉनच्या मुद्द्यावरून नेतन्याहूंच्या मंत्र्याचे ट्रम्प यांना आव्हान
Israel Attack Lebanon: इराणसोबतचे युद्ध संपवून या प्रदेशात चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान, इस्रायलने लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे स्पष्टपणे सूचित केले आहे.

Israel Attack Lebanon: इराणसोबतचे युद्ध संपवून या प्रदेशात चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान, इस्रायलने लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे स्पष्टपणे सूचित केले आहे.
इस्रायलचे अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रिच यांनी, “इस्रायली सैन्य येत्या अनेक वर्षांसाठी दक्षिण लेबनॉनमधील सुरक्षा क्षेत्रात तैनात राहील आणि अमेरिकेच्या दबावाखालीही माघार घेणार नाही” असे म्हणाले.
एका मुलाखतीत स्मोट्रिच यांनी, “जोपर्यंत हिजबुल्लाह आपली शस्त्रे पूर्णपणे आत्मसमर्पण करत नाही, तोपर्यंत इस्रायल आपली भूमिका बदलणार नाही.”सांगितले. त्यांनी दावा केला की, “अमेरिकेला इस्रायलच्या ‘रेड लाईन्स’ (अंतिम मर्यादा) समजतात आणि वॉशिंग्टन सैन्य मागे घेण्याची औपचारिक मागणी करेल अशी अपेक्षा नाही.”
स्मोट्रिच यांनी सांगितले की, “इस्रायल सुरक्षा क्षेत्रात केवळ तात्पुरत्या चौक्याच नव्हे, तर कायमस्वरूपी लष्करी पायाभूत सुविधा आणि तळ विकसित करू शकतो. त्यांनी सांगितले की, सध्याची सीमा व्यवस्था इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करत नाही आणि देशाला ‘संरक्षणात्मकदृष्ट्या सुरक्षित सीमांची’ गरज आहे. Israel Attack Lebanon:
इस्रायली नेत्याने जोर देऊन सांगितले, “जोपर्यंत हिजबुल्लाह आपली शस्त्रे आत्मसमर्पण करत नाही, तोपर्यंत आम्ही एक मिलीमीटरसुद्धा मागे हटणार नाही.” स्मोट्रिच यांनी दावा केला की, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री या मुद्द्यावर त्यांच्या मतांशी सहमत आहेत.
दरम्यान, इराण-अमेरिका कराराच्या अंमलबजावणीसाठी स्वित्झर्लंडमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा सुरू होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स हेदेखील स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत दोन्ही बाजू शस्त्रसंधी आणि कराराच्या विविध पैलूंवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
स्विस परराष्ट्र मंत्रालयाने इराणी शिष्टमंडळही स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाल्याची पुष्टी केली आहे. बर्गेनस्टॉक रिसॉर्टमध्ये होणारी ही बैठक, अमेरिका आणि इराण यांच्यातील अलीकडील कराराला पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. Israel Attack Lebanon:
मात्र, चर्चा सुरू होण्यापूर्वीच नवीन तणाव निर्माण होत आहेत. इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा केला आहे, तर लेबनॉनमधील इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव पूर्णपणे कमी झालेला नाही. परिणामी, संपूर्ण जगाचे लक्ष स्विस चर्चेकडे लागले आहे, कारण या चर्चेमुळे पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल की या प्रदेशात पुन्हा युद्ध भडकेल हे निश्चित होऊ शकते.






