Pune District : दिलासादायक बातमी! पुणे जिल्ह्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरले
Pune District : या धरणाला स्वतंत्र दरवाजे नसल्याने धरण भरताच सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे.

Pune District : खेड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील दीड टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले कळमोडी धरण रविवारी रात्री सुमारे नऊ वाजता शंभर टक्के भरले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने भरणारे हे पहिले धरण ठरले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून भीमाशंकर डोंगररांग, खरपूड आणि वरचे भोमाळे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आराळा नदीला मोठा पूर आला. त्यामुळे कळमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले. या धरणाला स्वतंत्र दरवाजे नसल्याने धरण भरताच सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे.

Pune District : दिलासादायक बातमी! पुणे जिल्ह्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरले
खेड आणि आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेल्या या धरणाच्या पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे कळमोडी धरणातून अतिरिक्त पाणी आता चासकमान धरणाकडे वाहणार असल्याने चासकमान धरणही लवकर भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





