Realme Narzo 80 Pro 5G Details | प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Realme ने अखेर आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Realme Narzo 80 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. 6.7 इंच फुल एचडी+ कर्व्हड AMOLED डिस्प्ले, Dimensity 7400 प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम आणि 6000mAh बॅटरीसह 80W SuperVOOC चार्जिंग हे या स्मार्टफोनचे मुख्य फीचर्स आहेत. दमदार फीचर्ससह येणाऱ्या रियलमीच्या या स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात. Realme Narzo 80 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स Realme Narzo 80 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंगसह येणारा 6.7 इंच फुल एचडी+ कर्व्हड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा पीक ब्राइटनेस तब्बल 4500 निट्स आहे. डिव्हाइसमध्ये MediaTek Dimensity 7400 चा पॉवरफुल प्रोसेसर आणि Mali-G615 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB आणि 12GB रॅम, तसेच 128GB व 256GB स्टोरेजचे पर्याय मिळतील. हा फोन Android 15 वर आधारित Realme UI 6.0 वर चालतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये रियरला 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मोनोक्रोम सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, USB Type-C, स्टिरिओ स्पीकर्स आणि Hi-Res ऑडिओसारखे प्रीमियम फीचर्सही यात आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, GLONASS आणि USB Type-C सारखे फीचर्स यामध्ये दिले आहेत. फोनला 6000mAh ची बॅटरी असून ती 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. Realme Narzo 80 Pro 5G ची किंमत Realme Narzo 80 Pro 5G हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB रॅमसह 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,499 रुपये असून, टॉप व्हेरिएंट म्हणजेच 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला फोन 23,499 रुपयात मिळणार आहे. यासोबतच कंपनीकडून 2,000 रुपयांपर्यंतचा अर्ली बर्ड डिस्काउंट आणि विद्यार्थ्यांसाठी 1,299 रुपयांचे खास बेनिफिट मिळतील. हा स्मार्टफोन Nitro Orange, Racing Green आणि Speed Silver या तीन रंगांमध्ये उपलब्ध नाही.