La Liga : रेयाल माद्रिदची आगेकूच
Updated On:

बार्सिलोना :- रॉड्रिगो आणि जुड बेलिंगहॅम यांनी पहिल्या हाफमध्ये केलेल्या गोलच्या जोरावर रेयाल माद्रिद संघाने ला लिगा फुटबॉलच्या पहिल्याच सामन्यात ऍथलेटिक क्लब संघावर 2-0 असा विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच रेयाल माद्रिदने आक्रमक खेळ केला. सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये माद्रिदने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, मात्र, त्यांना अपयश आले.
सामन्याच्या 28व्या मिनिटाला संघाला एकदा संधी मिळाली. यावेळी डॅनी कार्वाजलच्या साहाय्याने रॉड्रिगोने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
यानंतर माद्रिदने आपली आक्रमणे आणखी वाढवली. यानंतर डेव्हिड अलाबाच्या मदतीने युवा बेलिंगहॅमने 36 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 असे आघाडीवर नेले व याच गोलफरकाने रेयालने हा सामना जिंकला.





