रिअल लाईफ ‘हम दिल दे चुके सनम’ ! पतीनेच लावून दिलं पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न

लखनौ – काही वर्षांपूर्वी सलामान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट आला होता. या चित्रपटात अजय देवगण आपल्या पत्नीचं अर्थात ऐश्वर्या राय हिचं लग्न तिच्या लग्नाआधीच्या प्रियकरासोबत लावून देण्यास तयार होता. अशीच काही काहीशी स्टोरी कानपूरमधून समोर आली आहे.
येथील एका पतीनं आपल्या पत्नीचं लग्न तिच्या लग्नाआधीच्या प्रियकरासोबत लावून दिलं. त्यानंतर लोक या लग्नाचं कनेक्शन ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाशी लावत आहे.
सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील पंकजनं सहा महिन्यांपूर्वी कोमल नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्याच्या पत्नीने सांगितलं होतं, की तिचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे. यावर पतीने थंड डोक्याने सगळ समजून घेत, पत्नीला लग्नाच्या बंधनातून मोकळं केलं.
पंकजने पत्नीला आधी घटस्फोट दिला. यानंतर स्वतःच आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिलं. या घटनेबाबत बोलताना पत्नी कोमल म्हणते, की मी माझ्या पतीला लग्नानंतर काहीच दिवसात सांगितलं, की मी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते. तिच्या पतीनं म्हटलं, की तू जिथे खूश आहेस, ते ठीक आहे.
दरम्यान पंकजने सरकारी संस्था आशा ज्योती केंद्रात कोमलच्या लग्नासाठी सगळे कागदपत्र तयार केले. त्यानंतर लग्न लावून दिलं.
या लग्नाबाबत आशा ज्योती केंद्र अध्यक्ष संगिता यांनी सांगितलं, की जेव्हा कोमलचे पती आमच्याकडे आपल्या पत्नीचं लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन आले, तेव्हा हे ऐकून सुरुवातीला आम्हालाही विचित्र वाटलं. मात्र, मुलगी आणि सगळेच तयार असल्यानं आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं.

