मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यसाठी सरकारला पाठिंबा देण्याची तयारी – अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मराठा – ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली. यामुळे मराठा आरक्षण मिळण्याचा मार्ग सोप्पा होइल असे त्यांचे म्हणणे होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्याबद्दल महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे सलोख्याचा सूर स्वीकारताना दिसले.
या सरकारने जर आम्हाला मराठा – ओबीसी आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार हे सांगीतले तर सर्व विरोधी पक्ष या सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहे, असे दानवे यांनी पत्रकारांना सांगितले. सरकार मराठा समाजाच्या स्वतंत्रपणे बैठका घेते आणि विरोधी पक्षांसोबत चर्चेची स्थिती न सांगता विरोधी पक्षांना आंधारात ठेवतात असा आरोप त्यांनी केला.
याउलट जेव्हा सरकार अडचणीत सापडते तेव्हा त्यांना विरोधी पक्षांची आठवण येते, असा दावा त्यांनी केला. मराठा समाजाने इतर मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत कोट्याच्या मागणीसाठी केलेल्या निदर्शने केल्यामुळे महाराष्ट्रात ध्रुवीकरण वाढत आहे, परिणामी ओबीसी नेत्यांकडून ही याचा विरोध होत आहे.





