Satara: वाचन कट्टा उपक्रमामुळे स्क्रिन टाइम कमी होईल, राजेंद्र चोरगे; नगरवाचनालयाचा उपक्रम गुरुकुल स्कूलमध्ये उत्साहात
Satara श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्यावतीने रविवारी शाहूनगरमधील गुरुकुल स्कूलमध्ये आयोजित 'वाचन कट्टा' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Satara: नगर वाचनालयाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी होणारा वाचन कट्ट्याला उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण करणारा असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मत गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्यावतीने रविवारी शाहूनगरमधील गुरुकुल स्कूलमध्ये आयोजित ‘वाचन कट्टा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी श्री. चोरगे बोलत होते. या वाचन कट्ट्यात विद्यार्थी, पालकांसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. विद्यार्थी वाचनात तल्लीन झाल्याचे चित्र दिसत होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलचे जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, प्रकल्प व्यवस्थापक नीलिमा खांडके, ग्रंथपाल राजेश निकम, शिक्षक तेजस दुड्डे व सविता पवार यांनी प्रयत्न केले. नगर वाचनालयाच्यावतीने कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी श्री. चोरगे यांचे स्वागत केले. नगर वाचनालयाचे संचालक जयंत देशपांडे, फ्रदीप कांबळे, अतुल शालगर, उपेंद्र गरगटे, श्रीकांत कात्रे आदी उपस्थित होते.





