RCB vs PBKS : अर्शदीप सिंगने रचला इतिहास! पीयुष चावलाला मागे टाकत केला मोठा पराक्रम

RCB vs PBKS Arshdeep Singh highest wicket taker for Punjab Kings : आयपीएल २०२५ मधील ३४ सामना एम चिन्नास्वामी मैदानावर पावसाच्या व्यत्ययामुळे उशीरा सुरु झाला. हा सामना आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यात खेळला जात आहे. १४ षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात आरसीबी प्रथम फलंदाजी करताना टिम डेव्हिडच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबसमोर ९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान या सामन्यातील पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने इतिहास रचला आहे.
अर्शदीप सिंगने आपल्या नावावर केला मोठा विक्रम –
२६ वर्षीय अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम केला आहे. अर्शदीप सिंग आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने ७२ सामन्यांमध्ये ८६ विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यापूर्वी अर्शदीपच्या नावावर ८४ विकेट्स होत्या. पियुष चावलाने पंजाब किंग्जकडून ८४ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, आता या सामन्यात अर्शदीप सिंगने त्याला मागे टाकले आहे. अर्शदीपने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला झेलबाद करुन हा खास पराक्रम केला. यानंतर त्याने विराट कोहलीचीही विकेट्स घेतली.
पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
ARSHDEEP SINGH AT THE AGE OF 26:
– Most wickets for India in men's T20is.
– Most wickets for Punjab Kings in IPL. pic.twitter.com/nmxpNNsWo6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 18, 2025
- अर्शदीप सिंग – ७२ सामने, ८६ विकेट्स
- पियुष चावला – ८७ सामने, ८४ विकेट्स
- संदीप शर्मा – ६१ सामने, ७३ विकेट्स
- अक्षर पटेल – ७३ सामने, ६९ विकेट्स
- मोहम्मद शमी – ४२ सामने, ५८ विकेट्स
हेही वाचा – Rohit Sharma : ‘आता त्याच्या जाण्याची वेळी आली आहे…’, हिटमॅनबद्दल माजी भारतीय खेळाडूचं मोठं वक्तव्य
सामन्याबद्दल बोलायचे, पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीची फलंदाजी खूपच खराब होती, पण शेवटी डेव्हिडने २६ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला १४ षटकांत नऊ गडी गमावून ९५ धावा करण्यात यश आले. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येक डावात १४ षटके खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.





