RCB Chinnaswamy Stadium : चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा ‘IPL’चे सामने रंगणार? आरसीबीचा ४.५० कोटींचा मोठा ‘मास्टर प्लॅन’

RCB Chinnaswamy Stadium Updates : गेल्या वर्षीच्या भीषण दुर्घटनेनंतर बंदीचा सामना करणाऱ्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा एकदा क्रिकेटचे पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) फ्रँचायझीने स्टेडियमच्या सुरक्षेसाठी एक मोठा प्रस्ताव कर्नाटक राज्य क्रिकेट संघाला (KSCA) पाठवला आहे. यामध्ये ३५० हाय-टेक ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) कॅमेरे बसवण्याची तयारी आरसीबीने दर्शवली आहे.
काय आहे आरसीबीचा प्रस्ताव?
आयपीएल २०२५ मध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर बंगळुरूमध्ये काढलेल्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी होऊन ११ निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेट सामने भरवण्यास बंदी घालण्यात आली होती. आता आरसीबीने हे मैदान पुन्हा मिळवण्यासाठी पुढाकार घेतला आहे:
- एआय तंत्रज्ञान: ३०० ते ३५० एआय कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव.
- खर्चाची जबाबदारी: या उपक्रमाचा ४.५० कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च आरसीबी उचलणार आहे.
- फायदा: या कॅमेऱ्यांमुळे गर्दीचे व्यवस्थापन, रांगांचे नियोजन, प्रवेश आणि बाहेर पडणाऱ्या लोकांची रिअल-टाइम देखरेख आणि अनाधिकृत प्रवेश रोखणे सोपे होईल.
हेही वाचा – Babar Azam : BBL मध्ये पाकिस्तानी स्टार्सचा वारंवार अपमान? शाहीन-रिझवाननंतर आता भरमैदानात बाबरची नाचक्की!
रिपोर्टवर अवलंबून स्टेडियमचे भवितव्य –
𝗥𝗖𝗕 𝗖𝗔𝗥𝗘𝗦: Advanced AI video analytics technology for 𝗰𝗿𝗼𝘄𝗱 𝗺𝗮𝗻𝗮𝗴𝗲𝗺𝗲𝗻𝘁 at the 𝘊𝘩𝘪𝘯𝘯𝘢𝘴𝘸𝘢𝘮𝘺 𝘚𝘵𝘢𝘥𝘪𝘶𝘮.
In a formal communication to the KSCA, RCB has proposed the installation of 300 to 350 AI-enabled cameras at the M. Chinnaswamy Stadium.… pic.twitter.com/LuJ3v4uNwa
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) January 16, 2026
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील त्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने एक कार्यबल (Task Force) नेमले आहे. हे कार्यबल सध्या स्टेडियममधील सुरक्षा सुधारणांची पाहणी करत असून, त्यांचा अहवाल लवकरच सादर केला जाईल. या अहवालानंतरच मैदानावर क्रिकेट पुन्हा सुरू होणार की नाही, याचा निर्णय होईल.
वर्ल्ड कप आणि आयपीएल २०२६: आरसीबीकडे ‘प्लॅन-बी’ तयार
चिन्नास्वामी स्टेडियमला अद्याप सुरक्षेचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळालेले नाही. यामुळे आगामी टी-२० विश्वचषक २०२६ चे कोणतेही सामने या मैदानावर आयोजित करण्यात आलेले नाहीत. आयपीएल २०२६ चा हंगाम २६ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. जर चिन्नास्वामीला परवानगी मिळाली नाही, तर आरसीबी आपले घरचे सामने (Home Matches) पुणे किंवा रायपूरमध्ये खेळवण्याचा विचार करत आहे.





