RCB News : गेल्या वर्षी आयपीएल जेतेपदाच्या सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीतील ११ मृतांना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने (RCB News) आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले आहे. आगामी हंगामात सामन्यापूर्वीच्या सरावादरम्यान सर्व खेळाडू ११ क्रमांकाची जर्सी परिधान करतील आणि खेळाडूंच्या दंडावर काळी फिती असेल. तसेच, एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रत्येक घरच्या सामन्यात (RCB News) या चाहत्यांच्या स्मरणार्थ ११ जागा कायमस्वरूपी रिक्त ठेवल्या जाणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव यंदाचा प्रसिद्ध अनबॉक्स कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, प्रेक्षकांच्या सुविधेसाठी मेट्रो आणि पार्किंगच्या नियोजनात बदल करण्यात आले आहेत. आरसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मेनन यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना या उपक्रमांची घोषणा केली. Rajesh Menon गेल्या वर्षी ४ जून रोजी आरसीबीने (RCB News) आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवल्यानंतर बेंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणावर विजयोत्सव साजरा करण्यात आला होता. या उत्सवादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर अभूतपूर्व गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. यंंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.