IPL 2025 Final : नाद करा पण आरसीबीच्या चाहत्यांचा कुठं! संघाला नजर लागू नये म्हणून निंबू-मिरच्यांनी सजवली कार

IPL 2025 Final RCB vs PBKS Anti Nazar Squad car Video : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ जेतेपदाच्या सामन्यात आमनेसामने येतील. दोन्ही संघांच्या चाहत्यांना रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिल्या ट्रॉफीची आशा आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्याच्या गाडीने लक्ष वेधलं, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आरसीबीच्या चाहत्याची निंबू-मिरचीच्या कारचा व्हिडीओ व्हायरल –
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी, भारतातील आरसीबी चाहत्यांचा वेडापणा पाहण्यासारखा आहे. आरसीबी चाहते त्यांच्या संघाच्या विजयासाठी विविध युक्त्या करत आहेत. काही पूजा-पाठ आणि हवन करत आहेत, तर काही खेळाडूंच्या फोटोंवर लिंबू-मिरची लावत आहेत. त्याच वेळी, या अंतिम सामन्यापूर्वी, सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका आरसीबी चाहत्याने त्याची कार पूर्णपणे लिंबू आणि मिरचीने सजवली आहे. या कारच्या मागे आणि लिहिले आहे की, “ANTI NAZAR SQUAD”.
A car wrapped in nimbu and mirchi spotted in Bangalore to protect RCB from nazar ahead of the IPL Final.🤞 pic.twitter.com/VL8bMA5Hcr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 3, 2025
दोन्ही संघांना १७ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी –
आरसीबीने आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी करून आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या हंगामात आरसीबीने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे, त्यामुळे चाहत्यांना आशा आहे की संघ १७ वर्षांचा दुष्काळ संपवेल. या हंगामात, विराट कोहली, फिल साल्ट आणि जोश हेझलवूड सारख्या खेळाडूंनी आरसीबीसाठी दमदार कामगिरी केली आहे. आता रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, आरसीबी त्यांच्या पहिल्या ट्रॉफीपासून फक्त एक पाऊल दूर आहे.
हेही वाचा – IPL 2025 Final : आरसीबी-पंजाब सामना पावसामुळे रद्द झाला, तर जेतेपदाचा फैसला कसा होणार?
तसेच पंजाब किंग्जनेही यंदा नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली धमाकेदार प्रदर्शन केले आहे. या कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्जने ११ वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी पंजाब संघाने क्वालिफायर-२ मध्ये मुंबई इंडियन्ससारख्या संघाला हरवून आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता पंजाब किंग्ज देखील त्यांचा १७ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.





