‘RCB’च्या चाहत्यांवर लाठीचार्ज.! चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; नेमकं काय घडलं? पाहा…

RCB Victory Rally : आरसीबी संघाने आयपीएल 2025 जिंकले आहे आणि त्यानंतर बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये संपूर्ण संघाचा सन्मान केला जात आहे. मात्र, या सन्मानादरम्यान असे काही घडले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
प्रत्यक्षात, चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत 20 जण गंभीर जखमीही झाले आहेत. तर 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमवर नेमकं काय घडलं ?
आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना चेंगराचेंरी झाली.
Bengaluru: Fans faint at Chinnaswamy Stadium as crowds rush to get in for RCB team felicitation event #Bengaluru #RoyalChallengersBengaluru #BREAKING #chinnaswamystadium #Karnataka #IPL2025 https://t.co/XqJz807CY8 pic.twitter.com/ZxdCOaZso5
— Indian Observer (@ag_Journalist) June 4, 2025
यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी आरसीबीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला.
मिळालेल्या माहितीनुसार चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 3 जवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती. स्टेडियमजवळचे रस्ते चाहत्यांच्या गर्दीनं जाम झाले होते. यामुळं मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली.
आरसीबीची विजेती टीम विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी मैदानात दाखल होत असताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे. काही जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. तसेच या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समारंभाला कोण-कोण उपस्थित असणार :
कर्नाटक क्रिकेट असोशिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे बडे नेते उपस्थित आहेत. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते. यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील असणार आहे.





